आंतरराष्ट्रीय पेंटिग्ज स्पर्धेत नम्रता धन्वेने वेधून घेतले सर्वांचे लक्ष
बीड-
बीड शहरात सौ.के.एस.के.काॅलेज च्या सभागृहामधे शिवजन्मोत्सवानिमित्त जिल्हाभरातील कलाकारांचे चित्रकृती प्रदर्शन भरविण्यात आले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन डाॅ.शिरीष आंबेकर, डाॅ.बा.आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांचे हस्ते दि.17/02/2023 रोजी करण्यात आले. या प्रदर्शनात 90 कलाकारांच्या 200 पेक्षा जास्त कलाकृती प्रदर्शनास व विक्रीस उपलब्ध होत्या.
सदर प्रदर्शनात बीड येथील पोस्ट खात्याची कर्मचारी असणाऱ्या कु.नम्रता ज्ञानोबा धन्वे हीनेही सहभागी होत आपल्या कलाक्रती सादर केल्या,
तिने सादरीकरण केलेल्या पेंकीग्ज या स्पर्धेच्या आकर्षणाचा विषय मानला जात आहे.
चित्रकलेचे कोणतेही अधिकृत शिक्षण न घेणारी हौशी कलाकार नम्रताच्या पेंटिग्ज मात्र सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरल्याचे पाहावयास मिळाले.
अधिक माहिती घेतली असता समजले की,
तिने चित्रकलेचा लहानपणापासून छंद जोपासत अनेक पेंटिग्ज तयार केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक्झिबिशन मधे प्रथमच सहभागी होत आपल्या मुक्त चित्रकलेतून सर्वांचे मन जिंकली आहेत. यामुळे कु.नम्रता ज्ञानोबा धन्वे हीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
