छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बसंल क्लासेसच्या वतीने सर्धा परिक्षाचे आयोजन
केज / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बंसल क्लासेस केज यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वगुणसंपन्न विकास साध्य करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरिता स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक गट करण्यात आले आहेत . प्राथमिक आणी माध्यमिक गटात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास ५१११ तर द्वितीय येणाऱ्यास ३१११ तसेच तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांस २१११ रुपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे . स्पर्धा परीक्षेचे आयोजन दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ०९ वा.११वा. तसेच दुपारी ०१ वाजता बंसल क्लासेस , जीवन शिक्षण शैक्षणिक संकुल शिक्षक कॉलनी समोर केज येथे करण्यात आले आहे . तरी सदरील स्पर्धेचा लाभ शालेय विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन बंसल क्लासेस केजच्या वतीने करण्यात आले आहे.
