केज नगर पंचायतला नगरपरीषेदेचा दर्जा देण्याची प्रशासनाची हालचाल वेगात
आ. नमिताताई मुंदडा यांच्या निवेदनावर उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
केज न.प. दर्जा मिळाला तेव्हा ग्रा.पं. बरखास्त ; न.प. ला नगर पालिकेचा दर्जा मिळाल्यास काय होणार?
गौतम बचुटे/केज :- लवकरच केज नगर पंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये रूपांतर होण्याच्या हालचाली वाढल्या असून आ नमिताताई मुंदडा यांच्यापत्रावर उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
केज नगर पंचायतीचे रूपांतर नगरपरिषदे मध्ये होणार असल्याचे स्पष्ट संकेत असून केज विधानसभेच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी निवेदन दिले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाला तपासून कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्या नुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर परिषद प्रशासन विभागाने केज नगर पंचायतीच्या हद्दीत अकृषिक रोजगाराची टक्केवारीच्या बाबतीतील सद्यस्थिदर्शक प्रस्ताव आणि ठोस समर्थनासह तात्काळ माहिती केज नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे मागितली आहे.
आमदार नमिता मुंदडा आणि उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशा नुसार केज नगर पंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत झाले तर पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील की काय ? या चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.
मात्र केजमध्ये जेव्हा ग्रामपंचायत अस्तित्वात होती तेव्हा तेव्हा नगरपंचायत चा दर्जा प्राप्त झाला तेव्हा नवीन ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचा अठरा महिण्याचा कालावधीच सत्ता भोगता आली होती, ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायतीच्या निवडणूक प्रशासनाने घेतल्या होत्या. त्यामुळे जर सध्या नगरपालिकेचा दर्जा मिळाला तर नगरपंचायतचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठळक घडामोडी :-
दि. २६ ऑगस्ट २०२२ रोजी उपमुख्यमंत्र्यांना आ. नमिता मुंदडा यांचे पत्र
—————————–
दि. ३० जानेवारी २०२३ नगर विकास विभागाचे उपसचिव यांचे पत्र
——————————-
२ फेब्रुवारी २०२३ रोजी नगर परिषद प्रशासन विभागाचे मुख्याधिकारी यांना पत्र
——————————-
