आगीत रसवंती जळून कुटुंबाचे आर्थिक नुकसान
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील साळेगांव येथे लागलेल्या रसवंती जळून खाक झाली आहे.
केज-कळंब रोडवर साळेगांव येथे दि. १५ फेब्रुवारी रोजी शेतात वणवा पेटला. त्यात रोडच्या कडेला असलेल्या मुकेश लालासाहेब अंधारे यांच्या रसवंतीलाही आग लागली. त्यात डिझेल इंजिन, चरखा, खुर्च्या, टेबल असे साहित्य जळून त्यांचे संसारोपयोगी साहित्य सुद्धा जळाले आहे.
दरम्यान अंधारे हे शेतात गेले असल्याने अनर्थ टळला. मात्र उपजीविकेचे साधन जळाल्याने अंधारे संकटात सापडले आहेत आगीची माहिती मिळताच तहसीलदार डी. सी. मेंडके यांनी केज नगर पंचायतीचा आग विझविण्याचा बंब घटनास्थळी पाठविला तरी देखील आग आटोक्यात आली नाही.
