इन्फन्ट इंडियाच्या मुलांना सीमेन्स गणेश मंडळा कडून मोलाची मदत
गौतम बचुटे/केज औरंगाबाद येथील गणेश मंडळाच्या वतीने इन्फंट विद्यार्थ्यांना ८१ हजार रुपयाची मदत करण्यात आली.
एचआयव्ही बाधित मुले आणि रुग्णांसाठी दत्ताभाऊ बारगजे आणि त्यांच्या पत्नी सौ. संध्या बारगजे अविरत मेहनत घेत आहेत. त्यांच्या कार्याला मदत म्हणून आणि औषधोपचारासाठी त्या अहोरात्र कार्य करीत आहेत. त्याची दखल औरंगाबाद येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या गणेश मंडळांनी घेतली. दत्ता व संध्या बारगजे या कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक बैठक घेऊन इन्फंट इंडियासाठी लागणारे साहित्य खरेदी करून तेथील दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी गणेश मंडळाचे कार्यकर्ते सतीश बचुटे यांनी मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण कुलकर्णी आणि पंडित शेळके यांच्याशी करून बीड जिल्ह्यातील पाल येथील मदत करण्याचे ठरविले. त्यासाठी सतिश बचुटे यांनी
बारगजे आणि निशा हिंगे यांच्याशी संपर्क साधून त्यांना आवश्यक असणारे वॉशिंग, पाण्याचा हौद, खुर्च्या व इतर साहित्य खरेदी करून १२ फेब्रुवारी हे साहित्य भेट दिले. या वेळी रोजी इन्फन्ट इंडियाचे दत्ता बारगजे संध्या बारगजे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते कृष्णा राशीनकर, रामकृष्ण कुलकर्णी, पंडित शेळके, अशोक शेळके, नवनाथ शींदे, सतिश बचुटे, विजय , दत्तु भंडे, स्वामिनाथ केदार, संतोष दंडनाईक, प्रकाश जाधव उपस्थित होते.
गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी येथील विद्यार्थ्यांची संवाद साधून त्यांचे दुःख पाहून आणि बारगजे दाम्पत्य हे त्यांच्यासाठी करीत असलेली धडपड पाहून मंडळाचे कार्यकर्ते भारावून गेले.
