कर्तव्यदक्ष महीला अधिकारी दिपा मुधोळ-मुंडे बीडच्या नवीन जिल्हाधिकारी
बीड-
दिपा मुधोळ-मुंडे या बीड जिल्ह्याच्या नवीन जिल्हा अधिकारी म्हणून रूजू होत आहेत. यापुर्वी त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा अधिकार म्हणून कार्य केले आहे. तेथे त्यांचा कार्यकाळ चांगला ठरला आहे. एक कर्तव्यदक्ष महीला अधिकारी, बीड जिल्ह्यात येत असल्याने त्यांचे स्वागत होत आहे.
मा. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची बदली होणार अशी चर्चा होती. ती आज खरी ठरली असून शर्मा यांची बदली झाली आहे.
