बाळासाहेबांची शिवसेना बीड जिल्ह्यात भक्कम उभी करणार– डॉ. सौ. अंजलीताई घाडगे(महीला आघाडी बीड जिल्हा)
बीड-
डॉ. सौ.अंजलीताई घाडगे यांची नुकतीच बाळासाहेबांची शिवसेना महीला आघाडी बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिदे यांनी निवड केली आहे.
त्यांच्या या निवडीचे संपूर्ण जिल्ह्यातून स्वागत केले जात आहे.
डॉ. अंजलीताई घाडगे यांनी निवड झाल्यापासून संपूर्ण जिल्हाभर दौरे काडून नागरिक, महीला, कार्यकर्ते यांच्या भेटी घेत मा. मुख्यमंत्री व पक्षाचे विचार पेरून पक्षाचे बळ वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
गेल्या आठवड्यात ते केज येथे विश्रामगृह येथे कार्यकर्ता बैठकीत बोलताना म्हणाल्या की, मा. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून माझी महीला आघाडी जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली आहे. संपूर्ण बीड जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना भक्कम उभा करून त्यांच्या विश्वासाला पात्र ठरणार आहे. असे डॉ. अंजलीताई घाडगे यांनी मत व्यक्त केले आहे.
