Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीस मारहाण पत्रकार संरक्षण कायद्या नुसार दोघांवर गुन्हा दाखल सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत करणार तपास

By February 7, 2023No Comments2 Mins Read

प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीस मारहाण

पत्रकार संरक्षण कायद्या नुसार दोघांवर गुन्हा दाखल

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत करणार तपास

गौतम बचुटे–
केज :- केज बस स्टँडवर एसटी मध्ये एका न्यूज चॅनेलच्या पत्रकाराला मारहाण केल्या प्रकरणी दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे करीत आहेत.
या बाबतची माहिती अशी की, सुदर्शन न्यूज या टीव्ही चॅनेलचे प्रतिनिधी अभिमन्यू फड हे औरंगाबाद अंबाजोगाई गाडीने प्रवास करीत असताना केज बस स्टँडवर गाडी उभी असताना; त्यांना ते गाडीत उभे असताना केजहुन एसटी बस मध्ये चढलेले डॉ. मोसीन शेख आणि त्याच्या सोबतच अनोळखी इसम त्यांना पाठीमागे सरक असे म्हणाला आणि तु सुदर्शन न्युजचा आहेस काय ? असे म्हणून काहीही करतोस का ? असे म्हणून कॉलर धरुन खाली ओढुन मारहाण करुन शिविगाळ केली. तसेच त्यांच्या सोबतच्या काळ्या रंगाचे कपडे घातलेल्या अनोळखी इसमाने फड यांचा शर्ट फाडुन शिविगाळ केली. त्या दोघांनी पत्रकार फड यांना लाथाबुक्क्यांनी व चापटाने मारुन जिवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत पत्रकार फड यांच्या हातातील घड्याळ तुटले आहे.
या प्रकरणी सुदर्शन न्यूजचे पत्रकार अभिमन्यू फड यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून डॉ. मोसीन शेख आणि त्यांच्या साथीदारा विरुद्ध गु. र. नं. ७०/२०२३ ,भा. दं. वि. ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ आणि यासह महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य) मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतीबंधक अधीनीयम २०१७ या पत्रकार हल्ला विरोधी कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्रकार अभिमन्यू फड यांच्या वरील मारहाण आणि हल्ल्याच्या गुन्ह्याचा तपास स्वतः आय पी एस सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे करीत आहेत.

Post Views: 23

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.