Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

पोटच्या लेकाने केला बापाचा खून; बीड जिल्ह्यातील खळबळजनक घटना

By February 2, 2023No Comments2 Mins Read

पोटच्या लेकाने केला बापाचा खून;

बीड जिल्ह्यातील खळबळजनक घटना

टाकरवण :
झोपेत असलेल्या बापावर खोऱ्याच्या तुंब्याने डोक्यावर घाव प्रहार करून खून केल्याची घटना गुरुवार (ता.२) माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथे पहाटे ४ वा. दरम्यान घडली आहे. आरोपी मुलास माजलगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मारोती लक्ष्मण भुंबे (वय ५५) रा. टाकरवन ता.माजलगाव असे मृत वडिलाचे नाव आहे. तर बाळु उर्फ लक्ष्मण मारोती भुंबे (वय ३१) असे आरोपी मुलाचे नाव आहे. वडील मारोती लक्ष्मण भुंबे ह्यांनी त्यांचा मुलगा बाळु उर्फ लक्ष्मण भुंबे मागील आठ दिवसांपासून गायब असल्याची तक्रार माजलगाव ग्रामीण पोलिसात दिली होती. त्यानुसार ते व नातेवाईक ही त्याचा शोध घेत होते. मात्र आरोपी बाळु उर्फ लक्ष्मण हा गुरुवारी (ता.२) पहाटे ३.३० वाजण्याच्या दरम्यान अचानक घरी आला. यावेळी झोपेत असणाऱ्या वडीलावर एकाएकी खोऱ्याच्या तुंब्यानी डोक्यावर प्रहार करू लागला. यावर घरात असलेल्या नातेवाईकाने सोडवा सोडव केली, वडील मारोती यांना उपचारार्थ दवाखान्यात घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असताना पुन्हा परत येत बाळू उर्फ लक्ष्मण ने खोऱ्याने डोक्यात तुब्याने प्रहार केले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकल, पोलीस उपनरीक्षक सचिन दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल वी.बी.खराडे यांनी धाव घेत आरोपीस ताब्यात घेतले आहे. सदरील खुनाचे कारण समोर आले नसले तरी आरोपी बाळु उर्फ लक्ष्मण हा मनोरुग्ण असल्याचे बोलले जात आहे.

Post Views: 51

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 8
Total Users : 149388
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.