डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळेच सर्वांना समान संधी
–पोउनि राजेश पाटील
केज येथे मराठी पत्रकार परिषद व सर्व संघाच्या वतीने मूकनायक दिन साजरा
केज :- केज येथे मराठी पत्रकार परिषद व तालुक्यातील सर्व संघाच्या वतीने मूकनायक दिन साजरा करण्यात आला.
या बाबतची माहिती अशी की, केज येथे पत्रकार संघाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले होते. त्या निमित्त केज येथील पत्रकार बांधवांनी शासकीय विश्रामगृह येथे मूकनायक दिन साजरा केला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार प्रा. हनुमंत भोसले हे होते. यावेळी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी बोलताना पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळेच देशातील सर्व नागरिकांना समान संधी प्राप्त झालेली असून त्यांनी त्यांच्या मूकनायक या पाक्षीकातून उपेक्षितांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रा. डॉ. हनुमंत सौदागर, डी. डी. बनसोडे, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सदस्य विजयराज आरकडे, प्रा. हनुमंत भोसले व गौतम बचुटे यांनी मूकनायक पाक्षिक आणि मूकनायक दिनाच्या संदर्भात मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲड. अभय कुलकर्णी, आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, झुंजार पत्रकार संघाचे सचिव अध्यक्ष दशरथ चवरे, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष रामदास तपसे, स्वाभिमानी पत्रकार संघाचे चंद्रकांत पाटील, पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीत घाडगे, शेकापचे भाई मोहन गुंड, माजी सभापती कपिल मस्के, धनंजय कुलकर्णी, शेख इकबाल, संतोष गालफाडे, महादेव गायकवाड, धनंजय घोळवे, प्रकाश मुंडे, बाबा मस्के, विनोद ढोबळे, मुबशिरोद्दीन खतीब, महादेव काळे, बाळासाहेब जाधव तात्या गवळी, शिवाजी औसेकर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम बचुटे यांनी तर सूत्र संचलन विजयराज आरकडे यांनी आणि आभार रामदास तपसे यांनी व्यक्त केले.
