शितलताई लांडगे यांनी मकरसंक्रांत केली स्तुत्य उपक्रमांनी साजरी
सर्वत्र होतेय कौतुक
केज-
सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर असलेल्या सौ.शितलताई लांडगे यांनी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने घेतलेल्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
क्रांतीनगर येथील स्व:घरी संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
या कार्यक्रमावेळी महिलांच्या विविधस्पर्धा घेऊन पारितोषिक देण्यात आले. महिलांना चांगले विचारधन असलेली पुस्तके, अंधश्रद्धेवर आधारित पुस्तके, देण्यात आले. यावेळी मुलींनी माता जिजाऊ व सावित्री माई यांची वेशभूषा परिधान केली होती, अशा सुंदर कार्यक्रमात महिलांनी मनसोक्त आनंद घेतला. मकरसंक्रांती निमित्ताने हळदीकुंकवाच्या माध्यमातून महीलांना उपयोगी उपक्रम राबविण्यात आला त्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. शितलताई नेहमी आपल्या समाजकार्यातून आपले कर्तृत्व पार पाडत असतात.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ.अपर्णा कांबळे, स्वाती काळुंके, कु.श्रावणी कांबळे यांनी परिश्रम घेतले .
