हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त केज तालुका शिवसेनेच्या वतीने वृद्धश्रमातील वृद्धांना किराणा व कपड्यांचे वाटप
केज :-
शिवसेनेचे सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंती निमित्त केज तालुका शिवसेनेच्या वतीने संपर्क कार्यालयात अभिवादन करून मौजे कळसंबर येथील आपला परिवार वृद्धाश्रमात एक महिन्याचा किराणा सामान, वृद्धांना नविन कपडे व भोजनाची व्यवस्था करुन जयंती साजरी करण्यात आली. यावेळी केज तालुका शिवसेना तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, विधानसभा प्रमुख अशोक जाधव, युवा सेना तालुका प्रमुख अरविंद थोरात, शहर प्रमुख तात्या रोडे, कॉलेज कक्ष जिल्हाधिकारी किशोर घुले, पत्रकार दिपक नाईकवाडे, उपतालुका प्रमुख अभिजीत, रोहित कसबे, उपशहर प्रमुख पप्पू ढगे, किरण बडे, विभाग प्रमुख सुभाष ठोंबरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
