वक्रतुंड सामाजिक प्रतिष्ठान व महिला बचत गटाच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न
अर्चनाताई आडसकर, सिताताई बनसोड यांची प्रमुख उपस्थिती
केज (प्रतिनिधी)
दिनांक १८जानेवारी रोजी प्रशांत नगर केज येथे वक्रतुंड सामाजिक प्रतिष्ठान व महिला बचत गटाच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला बचत गटांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम तसेच तिळगुळ व वान लुटण्याचा कार्यक्रम संगीतमय कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमास उद्घाटक म्हणून केज नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सौ सीता ताई बनसोड, कार्यक्रमाच्या अध्यक्षा अर्चनाताई रमेशराव आडसकर नवचेतना सर्वांगीण विकास महामंडळाच्या मनीषाताई घुले या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती होत्या तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रमेश तात्या गालफाडे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. रमेश तात्या गालफाडे व जनविकास परिवर्तन आघाडीचे मा. हारुनभाई इनामदार होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती केज नगरीच्या नगरसेविका शकुंतला ताई अंधारे, अँडोकेट अनिताताई मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष शितलताई लांडगे ,तसेच महिला समोपदेश केंद्राच्या जनाताई खाडे हे उपस्थित होत्या यावेळी सीता ताई बनसोड मनीषाताई घुले व अर्चनाताई आडसकर यांनी महिलांना योग्य ते मार्गदर्शन केले तर सीताताई बनसोड यांनी बोलताना म्हणाल्या की महिला एकजूट झाल्या पाहिजेत महिला शिकल्या पाहिजेत यासाठी महिलांच्या पाठीशी आम्ही सतत खंबीरपणे उभे आहोत तर मनीषाताई घुले या बोलताना म्हणाल्या नवचेतना सतत महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे महिलांना व्यवसायासाठी जिथे अडचणी येतील तीथे उभे राहून इतकच नव्हे तर नवचेतना च्या माध्यमातून महिलांना व्यवसाय उभा करण्यासाठी व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महिला बचत गटांना वीस लाखापर्यंत कर्ज मिळवून देऊ असेही मनीषाताई घुले बोलताना म्हणाल्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा अर्चनाताई आडसकर यांनी दरवर्षी होतकरू मुलीच्या शिक्षणाचा भार स्वतः घेऊ व त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी घेऊ असेही बोलताना म्हणाल्या या कार्यक्रमाचे नियोजन श्री गणेश महिला बचत गट, रमाई बचत गट, ज्ञानधारा बचत गट, व गणेश महिला बचत गट या गटांनी केले होते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल वैरागे तर आभार प्रा. संजीवन कोरडे यांनी केले.
