साळेगांव येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उदघाटन
गौतम बचुटे/केज :- साळेगांव ता केज येथे राष्ट्रीय सेवा दलाच्या शिबिराचे उदघाटन संपन्न झाले.
या बाबतची माहिती अशी की, साळेगांव ता केज येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि तांबवेश्वर संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवशीय वार्षिक शिबीर आयोजित केले आहे.
दि. १८ जानेवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजनेचे वार्षिक शिबिराचे उदघाटन संपन्न झाले. कार्यक्रमाचे उदघाटन साळेगावचे सरपंच कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले तर पत्रकार गौतम बचुटे यांच्या हस्तेउदघाटन संपन्न झाले. या वेळी विशेष उपस्थितीत धारूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख प्रा. एन. एस. वाघमारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे मराठवाडा विभागाचे प्रमुख डॉ. ओ. बी. झंवर, उपसरपंच गणेश गालफाडे, ग्रामविकास अधिकारी ओम चोपणे, ग्रामपंचायत सदस्य रमेश इंगळे, कै. यशवंतराव चाटे शिक्षण व तांत्रिक प्रशिक्षण संस्था, तांबवाचे सचिव एस. बी. चाटे, तांबवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. टी. भोसले, राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे कार्यक्रम अधिकारी व्ही. आर. घुले, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. यु. सत्वधर, प्रा. बालाजी इंगळे, प्रा. एस. के. शिंपले, प्रा. सुर्यवंशी मॅडम, कोल्हे सर, आकाश चाटे यांच्यासह शिबिरार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शिबिरार्थीना मार्गदर्शन केले.
