Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

मनीषाताई घुले पद्मविभूषण जानकीदेवी बजाज पुरस्काराने सन्मानित

By January 12, 2023No Comments2 Mins Read

मनीषाताई घुले पद्मविभूषण जानकीदेवी बजाज पुरस्काराने सन्मानित

गौतम बचुटे/केज :- देश पातळीवर ग्रामीण महिला व्यवसाय व उद्योजकता विकास संदर्भात दिला जाणारा २९ वा जानकिदेवी बजाज पुरस्कार या वर्षी नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या संस्थापक सचिव श्रीमती मनिषाताई घुले यांना मुंबई येथे देण्यात आला.

दि. ११ जानेवारी रोजी मुंबई येथील आयएमसी लेडीज विंगच्या कार्यालयात प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधन ब्रँड नायकाच्या संस्थापक व सीईओ श्रीमती फाल्गुनी नायर यांच्या हस्ते आणि बजाज कुटुंबीय प्रसिद्ध उद्योग समूहातील सहकारी पदाधिकारी आणि मान्यवर यांच्या उपस्थती मध्ये मनिषाताई घुले यांना देण्यात आला.
या वेळी आयएमसी महिला विभागाच्या अध्यक्षा श्रीमती रोमा सिंघानिया यांनी पुरस्काराची प्रस्तावना केली. श्रीमती राधिका नाथ यांनी आयएमसीची भूमिका मांडली. पुरस्कार प्राप्त मनीषाताई घुले आपल्या सामाजिक जीवनाचा प्रवास आणि भूमिका स्पष्ट केली. प्रमुख पाहुण्या श्रीमती फाल्गुनी नायर यांनी आपले मत व्यक्त केले. श्रीमती प्रियदर्शनी कनोडिया यांनी सूत्रसंचालन केले तर उपाध्यक्षा श्रीमती अमरीता सोमय्या यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बजाज इलेक्ट्रिकचे मालक शेखर बजाज, निर्मल बजाज, पूजा बजाज, अनार शाह, ज्योती दोशी, डॉ. स्मिता दांडेकर, शिला कृपलानी, आशा जोशी, दीपा सोमण, दीपक सतावलेकर, मृणालिनी खेर, प्रदीप शाह, रूपा शाह व सोम्या रॉय आदी उपस्थित होते.
यावेळी नायका ब्रँडच्या प्रमुख फाल्गुनी नायर यांनी मनिषाताईं घुलेच्या कार्याला समाजातील महिलांसाठी एक प्रेरणदायी कार्य म्हणून संबोधित केले. नायका ब्रँडचा सुरुवातीचा प्रवास आणि मनिषाताई करीत असलेला नवचेतनाचा प्रवास हा जवळपास सारखाच आहे. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात नवचेतना ग्रामीण महिलांच्या उद्योगामध्ये एक विशेष प्रगती पथावर पोहचेल. असे म्हणाल्या.

मनिषा घुले ताईंनी आपला संघर्षमय जीवनप्रवास सर्वांसमोर मांडून आज कशा पद्धतीने त्या एक निराधार महिला ते ५०,००० महिलांच्या ताई बनल्या आहेत याची त्यांनी मांडणी केली.
भविष्यात ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणाऱ्या विविध योजनांची त्यांनी मांडणी केली. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अशा पुरस्कारांनी सन्मानित केल्याने ग्रामीण महिलांचे, कार्यकर्त्यांचे मनोबल अधिक वाढून ते आणखीन जोमाने, ताकतीने महिला सक्षमीरणासाठी तयार होतील. असा विश्वास त्यांनी दिला व सर्वांचे विशेष आभार मानले. या पुरस्कार सोहळ्यासाठी जानकीदेवी बजाज महिला महाविद्यालयाच्या मॅनेजमेंट विद्यार्थिनी तसेच प्रमुख मीडिया समूहाचे प्रमुख व सुरुवाती पासून त्यांच्या सोबत खंबीरपणे साथ देणारे कुटुंबातील. संस्थेचे महादेव जोगदंड, संस्थेचे सीईओ अनिल लष्कर, महिला कार्यकर्त्या कौशल्या थोरात, निर्मला जाधव, लक्ष्मी बोरा, वंदना कांबळे, रजनी काकडे, शिवाजी केंद्रे, विजय गोरे व दत्ता घुले हे उपस्थिती होतें.

Post Views: 33

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.