श्री संत भगवान बाबा पुण्यतिथी व पत्रकार दिनाच्या निमित्ताने केज शहरात रविवारी भव्य रक्तदान शिबिर आयोजण
केज: श्री संत भगवान बाबा पुण्यतिथी व पत्रकारिता दिनाचे औचित्य साधून श्री संत भगवान बाबा भक्त अनुयायी व आदर्श पत्रकार संघाच्या वतीने रविवार दि 8 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता हनुमान मंदिर, वकिलवाडी केज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून केज शहरातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन श्री भगवान बाबा पुण्यतिथी मंडळ व आदर्श पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या आंबेजोगाई येथील शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुडवडा निर्माण झाला असून सध्या तेथील रुग्णांना रक्ताची गरज भासलेली असून त्यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे. सामाजिक दायित्व समजून रक्तदात्यांनी या इमर्जन्सी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन भगवानबाबा पुण्यतिथी समिती व सर्व पत्रकारांच्या वतीने करण्यांत आले आहे.
