Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
चालू घडामोडी

आईच्या पुण्यस्मरण निमित्ताने साडे पाचशे रुग्णांची मोफत तपासणी डॉ. आकाश बचुटे यांचा स्तुत्य उपक्रम

By December 27, 2022No Comments2 Mins Read

आईच्या पुण्यस्मरण निमित्ताने साडे पाचशे रुग्णांची मोफत तपासणी डॉ. आकाश बचुटे यांचा स्तुत्य उपक्रम

केज :- आपल्या दिवंगत आईच्या पुण्यस्मरणा निमित्त त्यांची आठवण कायम राहावी आणि त्या निमित्त गोरगरीब व गरजू रुग्णांना सेवा मिळावी म्हणून दर वर्षी प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. आकाश बचुटे आणि त्यांच्या कुटुंबांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. आकाश बचुटे यांनी साडे पाचशे रुग्णांची तपासणी करून श्रद्धांजली अर्पण केली.

कळंब येथे आशा कान-नाक-घसा हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉ. आकाश बचुटे हे त्यांच्या मातोश्री कालकथीत आशाबाई बचुटे यांचे दि २८ डिसेंबर २०१४ रोजी निधन झाले. यांच्या पुण्यस्मरण दिना निमित्त त्यांचे चिरंजीव आणि प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. आकाश बचुटे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने हे सन २०१८ पासून दर वर्षी नियमित कान-नाक-घसा यांचे मोफत तपासणी शिबीर आयोजित केले जाते.
दरम्यान सोमवार दि. २६ डिसेंबर रोजी कान-नाक आणि घसा संबंधी विविध आजारांचे मोफत तपासणी व उपचार शिबर आयोजित केले गेले. या मोफत शिबिरात डॉ आकाश बचुटे यांनी सुमारे ५५० रुग्णांची तपासणी करून दिवंगत मातोश्री कालकथीत आशाबाई बचुटे यांना आदरांजली अर्पण केली.
या शिबिरात प्रामुख्याने कानाचे विविध आजार ज्यात कानातुन पु-येणे. कानामध्ये सर्दी जमा होणे. कानामध्ये मळ, बुरशी होणे. कानाच्या पडद्यावर छिद्र व कानाची पाळी फाटलेली असणे. जन्मतः कानाचा नासुर कानावरती सुज व गाठी असणे. कानामध्ये सतत आवाज येणे, चक्कर येणे, कमी ऐकु येणे तसेच मुल जन्मतः मुक व बधिर असणे यासह नाकाचे आजार ज्या मध्ये नाकाचे हाड व मांस वाढणे. ॲलर्जी, सर्दी सायनस ही लक्षणे. तसेच डोके व डोळ्यांच्या मध्ये दुखणे. नाकातुन सतत पाणी येणे. दुर्गंध येणे व बाहेरील सुगंध दुर्गंध न समजणे. चेहरा सुजणे व दुखणे. श्वास बंद होणे, नाक कोंदणे, नाकातून रक्तस्त्राव होणे. नाकामध्ये फोड व फुनसी येणे यासह घशाचे आजार यात टॉन्सिल – गाठी असणे. थॉयरॉईड व मानेवर सुज असणे. जिभेवर अल्सर, पांढरे चट्टे असणे. गालावर पांढरे, काळे, लाल चट्टे असणे. ओठांवर व जिभेवर सुज, गाठ येणे. रात्री व दिवसा सतत खोकला येणे, ढास लागणे. लहान मुलांमध्ये नाकाचे टॉसिन्ल असणे. तोंडातील कॅन्सरची गाठ व जखम असणे. सतत आवाज बसणे. आवाज घोगरा येणे. मानेवर विविध प्रकारच्या गाठी असणे. या आजारांची तपासणी करण्यात आली.

Post Views: 28

Related Posts

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;

July 2, 2024

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर केज पोलिसांची करडी नजर केज पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल एकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

June 10, 2024

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या विचारधारेचा समाविष्ट करण्यास विरोध केज तालुका जिजाऊ ब्रिगेडचे तहसील कार्यालयाकडे निवेदन

May 30, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.