सिओ अजित पवार थेट विजयी सरपंचाच्या भेटीला
केज–
बीड जिल्हा, सियो अजित पवार यांनी आज दि.२१ रोजी मस्साजोग येथे येऊन विजयी सरपंच संतोष देशमुख व सर्व नवनिर्वाचित ग्रा.प.सदस्यांचा सत्कार करून अभिनंदन केले आहे.
गेल्या पंचवार्षिक काळात सरपंच संतोष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मस्साजोग ग्रामपंचायतने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांनी गावपातळीवरील अनेक स्पर्धेत पारितोषिक पटकावले आहेत. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, व्रक्ष लागवड, पाणी फांऊंडेशन अंतर्गत चांगली कामगिरी केली होती, त्याचेच फलित म्हणून मस्साजोग ग्रामस्थांनी पुन्हा एकदा संतोष देशमुख यांना सरपंचपदी निवडून दिले आहे. ते रमेशराव आडसकर यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
सियो अजित पवार यांनी मस्साजोग येथे येऊन नवनिर्वाचित सरपंच, सदस्य यांचा सत्कार केला, यावेळी बोलताना ते म्हणाले की, यापूर्वीही सर्व गावाने चांगले काम केले आहे. यापुढेही सर्वांनी मिळून गावाचा सर्वांगीण विकासासाठी वैमनस्य बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करावे, विधायक कामासाठी तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही.
हा सत्कार समारंभ कार्यक्रम जि.प.शाळेत आयोजित करण्यात आला होता. यावेळी केज पं.स.चे बिडीओ मोराळे साहेब, दत्तात्रय चाटे सर, शाळेचे मुख्याध्यापक कोतंबीरे सर, पंजाब देशमुख व सर्व नवनिर्वाचित ग्रा.प.सदस्य, पँँनल प्रमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.