शेतीच्या वादातून सख्या भावात आणि जावाजावात तुंबळ हाणामारी एकाने केला कत्तीने वार तर दुसऱ्याने तोडला दाताने ओठाचा लचका अन् !
गौतम बचुटे/केज :- जमिनीच्या तुकड्याच्या वादातून केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाणे हद्दीतील तट बोरगाव ता अंबाजोगाई येथे सख्ख्या दोन भावात तुंबळ भांडणेझाली आहेत या भांडणात एका भावाने दुसऱ्यावर धारदार कत्तीने वार केला. तर दुसऱ्याने चक्क दाताने ओठाचा लचका तोडला आहे. या प्रकरणी दोघांच्याही फिर्यादी वरून एकमेकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
केज तालुक्यातील युसूफवडगांव पोलिस ठाणे हद्दीतील तटबोरगाव ता. अंबाजोगाई येथे जमिनीच्या वादातून अंगद धोंडीराम शितोळे आणि हरिदास धोंडीराम शितोळे या दोन सख्ख्या भावा -भावात दि. २३ नोव्हेंबर रोजी भांडण झाले.
अंगद धोंडीराम शितोळे याने युसुफवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याच्या नावावर तट बोरगाव शिवारात शेत गट नं. २८ मध्ये ५७ गुंटे शेत आहे. त्यांच्या शेता शेजारी त्याचा सख्खा भाऊ यांचे शेत आहे. दि. २३ रोजी सायंकाळी ७:०० वाजण्याचे सुमारास अंगद व त्याची पत्नी शुंभागी असे त्यांच्या घरी असताना त्याचे भाऊ हरीदास धोंडीराम शितोळे, दुशांत धोडीराम शितोळे, भावजई वर्षाराणी हरीदास शितोळे, वंदना हरीदास शितोळे, पुतणे अभिजित दुशांत शितोळे, महेश हरीदास शितोळे व किरण हरीदास शितोळे हे त्याच्या घरासमोर आले शिवीगाळ करू लागले व दुशांत शितोळे हा म्हणाला की, तु आपले जमीनीच्या वाटणीचे बॉंडवर सही कर. तुला आम्ही जमीन देणार नाहीत. असे म्हणुन घराचा दरवाजा तोडुन ते सर्वजण घरात घुसून त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तेंव्हा त्याची पत्नी शुभांगी ही त्यांना म्हणाली की, तुम्ही माझे नवऱ्याला का मारता? असे म्हणुन भांडण सोडवत असतांना दुशांत याने त्याचे हातातील लोखंडी कत्तीने शुभांगी हिचे डावे डोळ्याचेवर मारून दुखापत केली. तसेच दुशांत याने त्याचे हातातील लोखंडी कत्ती नाकावर मारून दुखापत केली. हरिदास शितोळे यांने त्याचे हातातील लाकडी दांडा डोक्यात मारून दुखापतत केली. व वर्षाराणी शितोळे, वंदना शितोळे हिने शुभांगी हिचा हात धरून चापट-बुक्यांनी मारून मुक्कामार दिला व अभिजीत, महेश, किरण यांनी त्याला व त्याच्या पत्नीला शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून मुक्कामार दिला. तसेच तिच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे पट्टी गंठण तोडुन भावजई वर्षाराणी घेतले. यापुढे आमच्या नादाला लागताल तर तुम्हाला आम्ही जिवंत सोडणार नाहीत. अशी जिवे मारण्याची धमकी देवुन निघुन गेले. या प्रकरणी अंगद धोंडीराम शितोळे यांच्या तक्रारी वरून हरीदास धोंडीराम शितोळे, दुशांत धोडीराम शितोळे, वर्षाराणी हरीदास शितोळे, वंदना हरीदास शितोळे, अभिजित दुशांत शितोळे, महेश हरीदास शितोळे, किरण हरीदास शितोळे सर्व रा. तटबोरगाव ता. अंबाजोगाई यांच्या विरुद्ध युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गु. र. नं. २०४/२०२२ भा दं. वि. १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२७, ४५२, ३२३, ४२७,५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे
तर हरिदास धोंडीराम शितोळे याने युसुफवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्याला तटबोरगाव ता अंबाजोगाई शिवारात शेत गट नं २७ मध्ये ५८ गुंटे शेत जमीन आहे. त्याच्या शेता शेजारी त्याचा भाऊ अंगद याचे शेत आहे. दि. २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास हरिदास शेतातुन घरी जात असतांना भाऊ अंगद शितोळे याचे घराजवळ आले असता अंगद हा रोडवर आला व म्हणाला की, तु माझ्या शेतात ट्रॅक्टर घालुन माझा ऊस का मोडलास? असे म्हणुन शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यावेळी हरिदास त्याला म्हणाला शिव्या का देतोस. असे म्हणताच त्याने त्याचे हातातील लोखंडी गजाने उजवे पायाचे पोटरीवर मारले व ओठाला चावा घेवुन दुखापत केली. त्यानंतर दुशांत हा भांडण सोडवण्यास आला असता त्यासपण अंगद याने शिवीगाळ करून त्याच्या हातातील लोखंडी गजाने पाठीत व डाव्या पायावर मारहान करून दुखापत केली. त्यानंतर अंगद याने भाऊ दुशांत याचे गळ्यातील चार तोळ्याची सोन्याची चैन किंमती अंदाचे १ लाख २० रू ची काढुन घेतली. त्यानंतर आमच्या भांडणाच्या आवाजाने हरिदासची पत्नी वंदना व भावजई वर्षा हया त्या ठिकाणी आल्या असता भावजई शुभांगी हिने शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी चापटाने मारहान केली. त्या नंतर भाऊ अंगद याचे मेहुणे गणेश विनायक पवार , दिनेश विनायक पवार रा. देवळा व पुतण्या शिवम शितोळे यांनी भाऊ दुशांत, पत्नी वंदना, भावजई वर्षा यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहान केली. तसेच तुम्हाला जिवंत सोडणार नाही. आशा जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
हरिदास शितोळे यांच्या तक्रारी वरूनअंगद धोंडीराम शितोळे, शुभांगी अंगद शितोळे, शिवम अंगद शितोळे, गणेश विनायक पवार, दिनेश विनायक पवार यांचे विरूध्द गु. र. नं. २०६/२०२२ भा. दं. वि. १४३ , १४७ , १४ ९ , १४८ , ३२४ , ३२७ , ३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे