Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
सिनेमा

केज तालुक्यातील रहीवासी, प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ घुले यांचे चित्रपट निर्मितीत पदार्पण

By July 13, 2023No Comments2 Mins Read

केज तालुक्यातील रहीवासी, प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ घुले यांचे चित्रपट निर्मितीत पदार्पण

केज/प्रतिनिधी

‘अंकुश’ या आगामी चित्रपटातून केज तालुक्यातील टाकळी येथील श्री. राजाभाऊ आप्पाराव घुले मराठी सिनेसृष्टीत निर्माते म्हणून पदार्पणासाठी आता सज्ज झाले आहेत. ओमकार फिल्म्स क्रिएशन या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘अंकुश’ या चित्रपटाची निर्मिती झाली असून येत्या ६ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आता लवकरच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात येणार आहे.

अतिशय रोमहर्षक साहसदृश्य आणि एक आगळी- वेगळी प्रेमकहाणी यांचा मिलाफ आणि त्यातून सामाजिक संदेश या चित्रपटात असणार आहे. तगडी स्टार कास्टिंग आणि दिग्गज तंत्रज्ञ यांना घेऊन आपल्या पहिल्याच निर्मितीत राजाभाऊ आप्पाराव घुले यांनी एक बिगबजेट चित्रपट निर्मित केलेला आहे.

या चित्रपटाबरोबर ते निर्माता म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत. केवळ एकच चित्रपट न करता मराठी, हिंदी सिनेसृष्टीत वेगवेगळे मनोरंजक आणि बिगबजेट चित्रपटांची निर्मिती करण्याचे प्रसिद्ध निर्माते श्री. राजाभाऊ आप्पाराव घुले यांचा मनोदय आहे.ओमकार फिल्म्स क्रिएशनअंतर्गत नव्याने सुरू होणाऱ्या निर्मितीत अनेक होतकरू आणि सुप्रसिद्ध अशा कलाकारांना घेऊन वेगवेगळ्या विषयांवर चित्रपटनिर्मिती करण्याचा मानस निर्मात्यांचा असून, ‘अंकुश’ या चित्रपटाद्वारे याची सुरुवात झाल्याचं निर्माते राजाभाऊ आप्पाराव घुले यांनी सांगितले.

‘अंकुश’ या आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपटात निर्मात्यांनी दक्षिण सिनेसृष्टीतील प्रसिद्ध साहस दृश्य दिग्दर्शक, हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक यांचे बहारदार नृत्य असून, त्याचे चित्रीकरण परदेशात करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, तसेच मराठी सिनेसृष्टीतील तगडी स्टारकास्ट या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येण्यास आता सज्ज झाले आहेत.

Post Views: 161

Related Posts

बिग बजेट अंकुश चित्रपटाच्या प्रमोशनला नागरिकांची मोठी गर्दी बीडच्या ‘आदित्य शिक्षण संस्थेत‘ पार पडले ‘यशस्वी प्रमोशन’

October 5, 2023

केजचा सुपुत्र झळकणार रुपेरी पडदयावर मंगळवारी बीड येथे ”अंकुश” चित्रपटाचे भव्य प्रमोशन

October 1, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 5 0 4 8 6
Total Users : 150486
Views Today : 11

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.