राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे…रमेशराव आडसकर साहेब
जन्मदिन विशेष-
शब्दांकन
(विजयराज आरकडे)
१ जुन म्हणजे बीड जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व असणारे नाव म्हणजे रमेशराव आडसकर साहेब यांचा वाढदिवस, केज, धारूर, अंबाजोगाई, माजलगाव, वडवणी या तालुक्यात व ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करतात.
रमेशराव आडसकर यांचे नाव घेतले तरी त्यांचे व्यक्तीमत्व डोळ्यासमोर उभे राहते. उंचपुरा शरीर बांधा, आवाजातील भारदस्तपणा, बोलण्याची खास पद्धत यामुळे समोरच्या व्यक्तीला ते साहजिकच प्रभावित करतात.
गेल्या दोन दशकापासून ते जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. जि. प. सदस्य, जि. प. उपाध्यक्ष, आंबा साखर कारखानाचे चेअरमन, छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव व आत्ता भाजप प्रदेश सदस्य असे विविध पदांवर ते विराजमान झाले आहेत. ते फक्त आणि फक्त कार्यकर्ते यांचे प्रेम, बळाच्या जोरावर व स्वकर्तृत्वावर ते इथपर्यंत पोहचले आहेत.
स्वर्गीय,आमदार बाबुरावजी (तात्या) आडसकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा वसा घेऊन गरिब, गरजू युवक, नागरिक यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात, राजकारणात सत्ता असो किंवा नसो त्यांच्या घरी नागरिक, कार्यकर्ते यांची कायम वर्दळ पाहावयास मिळते. कारण म्हणजे ते जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. स्पष्ट बोलणे, जे होते तोच शब्द देणे, दिलेला शब्द वचन समजून पाळणे या गुणांमुळे ते युवकांपासून ते जेष्ठ नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरलेले आहेत.
रमेशराव आडसकर म्हणजे जिल्ह्यातील एक स्वच्छ प्रतिमा असणारे , जनतेच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी राजकीय व शासन दरबारी पाठपुरावा करून ते मार्गी लावणारा नेता म्हणून ओळखले जातात. राजकीय क्षेत्रात केज, धारूर, अंबाजोगाई व आता माजलगाव, वडवणी तालुक्यात त्यांची पकड असून कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली आहे.
याच बरोबर शैक्षणिक संस्था व सहकार क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी युवकांना नौकर्या व रोजगार उपलब्ध करून अनेक कुटुंबांना आर्थिक सक्षम केले आहे.
स्व:ता निर्वेसणी असल्याने ते आपल्या कार्यकर्त्यांना वेसनापासून दुर राहण्याचा मोलाचा सल्ला देताना पाहावयास मिळते.
शेवटी रमेशराव आडसकर म्हणजे जिल्ह्यातील एक राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तीमत्व ठरत असल्याचे नागरिक बोलत आहेत.
अशा एका आदर्श व्यक्तीमत्वास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!! 
