Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
सुपरवुमन

केजची कन्या पूनम गिरी-पुरी संविधान जागृती आणि स्त्री शक्ती कलारत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

By April 12, 2023Updated:April 12, 2023No Comments2 Mins Read

केजची कन्या पूनम गिरी-पुरी

संविधान जागृती आणि स्त्री शक्ती कलारत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

 :- बीड– (केज) 

केज सारख्या छोट्या शहरात शिक्षण घेऊन आपल्या अंगातील कलागुण अभिनय व बुद्धीने विविध क्षेत्रात यशाची उत्तुंग भरारी घेत राज्यस्तरीय संविधान जागृती आणि स्त्री शक्ती कला रत्न पुरस्काराने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले आहे. या पूर्वीही त्यांनी अनेक क्षेत्रात आपल्या कला गुणांची छाप उमटविलेली असून विविध पुरस्काराने सन्मान झालेला आहे.

केज जि बीड येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार पुरी यांची कन्या पूनम गिरी-पुरी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे केज येथे झालेले आहे. त्यांना कोल्हापूर येथे झालेल्या एस पी नाईन मराठी माध्यम समूह व महाराष्ट्र शासन उपक्रम पर्यटन धोरण अंतर्गत कला, सांस्कृतीक, राजकीय व पर्यटन समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय भारतीय संविधान जागृती आणि स्त्रीशक्ती सन्मान सोहळा कोल्हापूर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात केजची कन्या पूनम गिरी-पुरी यांना राज्यस्तरीय भारतीय संविधान जागृती आणि स्त्री शक्ती सन्मान (कलारत्न) देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळंबा कारागृहाचे अधीक्षक पांडुरंग भुसारी, कोल्हापूरचे सहआयुक्त विशाल लोंढे, मानवी फाउंडेशनचे भारती चव्हाण, तर उद्घाटक म्हणून सिनेअभिनेत्री दिपाली भोसले (सय्यद) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी महापौर निलोफर अजरेकर, सिनेअभिनेत्री शुभांगी गायकवाड, राजू पटेल, राऊत, सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुनम गिरी या सद्द्या बदलापूर (मुंबई) येथे वास्तव्यास आहेत.
त्यांनी या पूर्वी कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात खूप मोठी भरारी घेतलेली आहे. पूनम गिरी-पुरी या मिस इंडिया क्वीन म्हणून देश विदेशात नाव लौकिक मिळविलेला आहे.
तसेच मिस इंडिया राॅयल ग्लोबल क्विन इंटरनॅशनल २०२२, विनर ऑफ द क्विन इंडिया, मिस इंडिया स्टाईलिश, मिस इंडिया क्विन इंटरनॅशनल २०२२(दुबई), राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पोर्ट्स डान्स २०२३, गोल्ड मेडलिस्ट, मॉडेलिंग, फॅशन शो जज, ब्रँड शुट एमजी मोटर, शो स्टॉपर फॅशन फेवर या सारखे पुरस्कार त्यानी पटकाविले आहेत. तसेच त्यांनी भाग्य दिले तू मला या मालिकेत पाहुणी कलाकार म्हणून भूमिका केलेली आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारा बद्दल केजवासीयांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Post Views: 130

Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.