युसुफवडगाव येथे श्रीराम नवमी निमित्त परंमपरेनुसार श्रीराम जन्मोत्सवास सुरुवात
प्राचीन मंदिर असल्यामुळे भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी
केज :-
केज तालुक्यातील युसुफवडगांव येथे श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळ्यास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.
दशरथ नंदन श्रीरामचंद्र महाराज की जय असा जयघोष करीत भाविकांनी भरलेल्या १२ गाड्या ओढण्याची परंपरा कायम ठेवली.
युसूफवडगांव येथे अतिशय प्राचीन राम मंदीरात प्रभू रामचंद्रा सोबत सीता माता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि मारुती या दैवतांच्या पंचधातुच्या मुर्ती आहेत. मंदिरात चैत्र शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केल्या नंतर दशमी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले जाते. गुरुवारी राम नवमी निमित्त पहाटे सर्व मुर्तीना अभिषेक घालून दुपारी प्रभुरामांची मुर्ती एका सजवलेल्या पाळण्यात ठेवण्यात आल्या. राम मंदिरात श्रीधर महाराज रामदासी यांचे नार्दिय गुलालाचे किर्तन झाले. दुपारी बारा वाजेच्या सुमारास दशरथ नंदन रामचंद्र महाराज की जय असा जयघोष करीत गुलाल पुष्प उधळून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्या नंतर गावातून प्रभू रामचंद्रांची पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक गावच्या वेशीत येताच गाडे ओढण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी खास पुण्याहून आणलेल्या ढोल-ताशा पथकाने लक्ष वेधले. गाड्या ओढण्याचा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी गावातील व परिसरातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. श्रीराम ग्रुप व स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप. युसुफवडगांव येथे सध्या श्रीराम नवमी जन्मोत्सव व भव्य यात्रा महोत्सव चालु असुन आज पहिल्या दिवशी राम जन्म सोहळ्या नंतर आलेल्या भाविक भक्तांना श्रीराम ग्रुप पुणे व श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
युसुफवडगांव येथे ३५० ते ३७५ वर्षा पूर्वीचे पुरतान श्रीराम मंदिर असुन दरवर्षी येथे श्रीराम नवमीला जन्मोत्सव सोहळा व यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. हा सोहळा पाहण्यासाठी व श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आजुबाच्या पंचक्रोशीतुन व मोठ्या संख्येने भाविक येतात. हा श्रीराम नवमी जन्मोत्सव व यात्रा महोत्सव ३ दिवस चालतो. त्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने मागील वर्षा पासुन श्रीराम नवमी अर्थात मंदिरात प्रभु श्रीरामचंद्र महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा पार पडल्या नंतर श्रीराम ग्रुप पुणे व श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. याही वर्षी दि. २९ मार्च रोजी रामजन्म सोहळ्या नंतर आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्यासाठी महेश गायके, बापुसाहेब भुसारी, बाळासाहेब लामतुरे, विकास जाधव, अनिल निकम, अनंत जाधव, बाळासाहेब सपकाळ, प्रसाद कुलकर्णी, अमोल थळकरी, महादेव मोडवे, छगन निकम, उमाकांत सौंदणे, गणेश रोडगे, दयानंद सातपुते व पत्रकार सचिन उजगरे यांनी परिश्रम घेतले.
